मिशनरींच्या प्रार्थना सभेत हिंदूंचे धर्मांतर; विरोध केल्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण!

04 Mar 2024 17:53:44
Chhattisgarh Conversion case

रायपुर : छत्तीसगडच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रार्थना सभेच्या बहाण्याने शेकडो लोकांचे धर्मांतर करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी या सभेला विरोध केला तेव्हा मिशनऱ्यांच्या लोकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. ही घटना दि. ३ मार्च रोजी घडली.


हे वाचलं का : "हिंदू हा धर्म नाही, ते तर..." 'ख्रिश्चन मोर्चा'च्या कार्यक्रमात हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दुर्गच्या पद्मनाभपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की, त्यांना येथे अनेक दिवसांपासून धर्मांतराच्या कटाच्या तक्रारी येत आहेत. ओरिया कॉलनीत प्रार्थना सभेच्या नावाखाली धर्मांतराचा हा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रायपूर नाक्याजवळील एका चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली ज्यात शेकडो लोक उपस्थित होते. या घटनेची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटना स्थळी जाऊन विरोध दर्शवला.




यावेळी धर्मांतर करणाऱ्या मिशनऱ्यांच्या लोकांनी बजरंग दलाच्या लोकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान प्रार्थना सभेत दगडफेक झाल्याची ही माहिती आहे. त्यानंतर झालेल्या वादात दोन्ही बाजूचे लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या गोंधळाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही बाजू एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत आहेत. वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पक्षांना शांत केले. विरोधकांवर कारवाईची मागणी करत दोन्ही पक्षांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

गुपचूप प्रार्थना करण्याचा अर्थ काय, असा सवाल बजरंग दलाचे सहसंयोजक रामलोचन तिवारी यांनी केला आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्मोपदेशकांवर हिंदू वस्त्यांमध्ये पत्रके वाटून पैसे आणि शिक्षणाचे आमिष दाखवल्याचा आरोप केला आहे. त्याच वेळी, ख्रिश्चन समुदायाचे सचिव आणि पाद्री विनोद यांनी एका हिंदू संघटनेशी संबंधित १५ ते २० लोकांनी प्रार्थना करत असलेल्या लोकांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की केवळ ख्रिश्चनच नाही तर प्रत्येक धर्माचे लोक प्रार्थनेत सहभागी होतात. दुर्गचे पोलीस अधिकारी चिराग जैन यांनी ही घटना गैरसमजातून घडली असून, नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

 
Powered By Sangraha 9.0