"उद्धवजी पिक्चर सोडा आपलं नाटक होणार नाही याची काळजी घ्या!"

    31-Mar-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray

 
नाशिक : उद्धवजी आपलं नाटक होणार नाही याची काळजी घ्या, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. गिरीश महाजनांनी रविवारी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
गिरीश महाजन म्हणाले की, "जसजश्या निवडणुका जवळ येतील आणि त्यांना निकाल समजतील तेव्हा ते अजून काय काय बोलतील. ते कुणाला पिक्चर दाखवतील, कुणाला नाटक दाखवतील तर त्यांची मजल कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आम्हाला काहीतरी दाखवण्यापेक्षा तुम्ही आता महाराष्ट्रात फिरावं. आपली एखादी जागा निवडून येते का? याचा विचार करावा."
 
हे वाचलंत का? -  इंडी आघाडीच्या सभेत राहूल गांधींकडून उद्धव ठाकरेंचा अपमान?
 
"तुम्ही आता एवढ्या मोठ्या पक्षाचे प्रमुख आहात. आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आपल्याकडे ५५ पैकी ५-७ लोकंही राहिलेले नाहीत. त्याची चिंता करा. तुम्ही कोणाला काय पिक्चर दाखवता. तुमचाच पिक्चर लोकं तुम्हाला दाखवतील. तुमचाच पिक्चर लोकांना बघण्याची वेळ आता आली आहे. लोकं भाजपच्या आणि मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे आम्हाला पिक्चर न दाखवता आपलं नाटक होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या," असा टोला त्यांनी लगावला.
 
ते पुढे म्हणाले की, "त्यांच्याकडे होते तेव्हा सगळे चांगले होते आणि आता त्यांच्याकडून इकडे आल्यावर आमचं वॉशिंग मशीन झालं आहे. तुमच्याकडे असताना ते लोकं भ्रष्ट होते का? त्यांच्याकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे राहिले नाही म्हणून आता वॉशिंग मशीन, खोके वगैरे ते बडबडत आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "उद्धवजींना सख्ख्या भावाच्या विरोधात कोर्टात का जावं लागलं?"
 
सुप्रिया सुळेंवर बोलताना ते म्हणाले की, "सुप्रियाताईंकडे गृहखातं असताना त्यांनी किती सक्षमपणे हाताळलं याची आपल्याला कल्पना आहे. ताईंना म्हणावं तुम्ही अजिबात आमची काळजी करु नका. आम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ. कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. तुम्ही त्याची काळजी करु नका. तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या. हे मुद्दे ऐकून लोक तुम्हाला मतदान करणार नाही," असेही ते म्हणाले.