लहानगा ब्लॅक पँथर आईकडे परतला!

साताऱ्यात बिबट्याच्या तीन बछड्यांचे यशस्वी ‘रियुनियन’

    31-Mar-2024
Total Views |


leopard cubs


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
साताऱ्यातील एका कंपनीच्या रिकाम्या टाकीमध्ये रविवार दि. २४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास बिबट्याची तीन पिल्ले (leopard cubs) आढळली होती. या तीनपैकी एक बिबट्याचे पिल्लू (leopard cubs) संपुर्ण काळे म्हणजेच मेलानिस्टीक होते. या तीन पिल्लांची (leopard cubs) आणि त्यांच्या आईची त्याच दिवशी पुनर्भेट घडवून आणण्यात वनविभाग आणि रेस्क्यू-पुणे यांना यश मिळालं.

साताऱ्यातील एका कंपनीच्या आवारात असेल्या टाकीमध्ये तीन बछडे (leopard cubs) आढळून आल्यानंतर सातारा वनविभागाने त्यांना सतर्कतेने ताब्यात घेतले. एक संपुर्णपणे काळा असलेला आणि इतर दोन बछडे (leopard cubs) सुखरूप आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पशुवैद्यकीय तपासणीमध्ये हे बछडे (leopard cubs)  सुखरूप असल्याचे समजताच त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीसाठी वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांनी तयारी केली. मादी बिबट्या जवळपासच असल्याची खात्री करत तिन्ही पिल्ले (leopard cubs) पिंजऱ्यात ठेवण्यात आली. रात्री सात ते आठच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्यानंतर पिंजऱ्याचे दार उघडताच आई आणि पिल्लांची (leopard cubs) पुनर्भेट घडून आली.


या कार्यवाहीमध्ये सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजूर्णे यांच्याबरोबरच वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, भरतगावचे वनरक्षक राज मोसलगी, परळी वनरक्षक सुहास काकडे, रेसक्यू टीमचे ओंकार ढाले, पवन शिरतोड व पुणे रेसक्यू टीमचे नरेश चांडक, सिध्दी पंचारिया, डॉ. पूर्वा निमकर यांचा समावेश होता.

“रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने मेलानिस्टिक लेपर्डचे केलेले हे दुसरेच आणि दुर्मिळ रियुनियन होते. यावेळी या पिल्लांचे यशस्वी रियुनियन झाले याचा आनंद आहे. अनेकदा शेतात किंवा इतर ठिकाणी पिल्ले आढळतात, अशावेळी गोंधळून न जाता सर्तकता दाखवत वनविभाग किंवा जवळच्या रेस्क्यू सेंटरशी संपर्क साधायला हवा जेणेकरून नागरिक आणि वन्यजीवांच्या दृष्टीने संरक्षणात्मक पाऊले वेळीच उचलता येतील.”

- सिद्धी पंचारिया
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे