महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात ९७ उमेदवार रिंगणात, १९ एप्रिलला मतदान!
30 Mar 2024 21:44:25
मुंबई : महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात ९७ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. ३० मार्च रोजी शेवच्या दिवशी १३ जणांनी माघार घेतली असून, उर्वरित उमेदवारांचे भवितव्य १९ एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे. नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखे दिग्गज नेते रिंगणात असल्यामुळे हा टप्पा लक्षवेधी ठरणार आहे.
मतदारसंघ...... उमेदवार..... मतदारसंख्या
रामटेक - २८ २० लाख ४९ हजार ८२
नागपूर - २६ २२ लाख २३ हजार २८१
भंडारा गोंदिया - १८ १८ लाख २७ हजार १८८
गडचिरोली चिमूर - १० १६ लाख १७ हजार २०७
चंद्रपूर - १५ १८ लाख ३७ हजार ९०६
एकूण - ९७ ९५ लाख ५४ हजार ६६७
मतदारसंघानिहाय प्रमुख उमेदवार पुढीलप्रमाणे :-
नागपूर - नितीन गडकरी (भाजप), विकास ठाकरे (काँग्रेस)