“मला स्टार नाही तर तुमची लेक समजा”, कंगना राणावतने फोडला प्रचाराचा नारळ

    30-Mar-2024
Total Views |
अभिनेत्री कंगना राणावत लोकसभा निवडणूकीचा रिंगणात उतरली असून तिने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
 
 

kangana ranaut 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) अभिनोयासोबतच आता राजकारणातही सक्रीय झाली आहे. भाजपने तिला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून लोकसभा निवडणूकीचे तिकीट जाहिर केले आहे. या ही बॉलिवूड क्वीन कंगना (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न झाली आहे. शुक्रवार २९ मार्चपासून तिने मंडी मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली असून रोड शो द्वारे तिने मतदारांशी संवाद साधला.
 
कंगना राणावत हिने प्रचारादरम्यान लोकांशी बातचीत करताना विकास हाच भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचे म्हटले. तसेच ‘जय श्रीराम’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देत तिचा संवाद सुरु होता. यावेळी बोलताना कंगना म्हणाली की, “महिलेची पार्श्वभूमी आणि व्यवसाय कोणताही असो, तिला सन्मान मिळायला हवा’, असे कंगनाने म्हटले. तसेच, काँग्रेस नेत्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या आक्षेपार्ह टिकेमुळे आपण दुखावलो असल्याचेही कंगनाने म्हटले. पुढे बोलताना ती असं देखील की, “मला स्टार किंवा अभिनेत्री समजू नका, मी तुमची लेक आहे”.
 
पुढे मंडी बद्दल बोलताना कंगना म्हणाली, “मंडीला जगभरात ‘लिटिल काशी’ म्हणून संबोधले जाते. याच मंडीबद्दलच्या निंदनीय वक्तव्यामुळे मी आणि मंडीतील जनता दुखावली आहे’, असेही कंगनाने पत्रकारांशी बोलताना म्हटले.