डॉ. आनंदीबाई जोशींच्या स्मृतिदिनी पुण्यात कार्यक्रम

    30-Mar-2024
Total Views |

pathak 
 
मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती, पुणे महानगर आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. '१९ व्य शतकातील बदलत्या स्त्री जाणिवा असा विषय या सत्राचा होता. या कार्यक्रमास महर्षि कर्वे स्त्री शिक्षण, संस्थेचे अध्यक्ष डाॅ. रवी देव, भा.इ.सं. समिती प. महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डाॅ. अरुणचंद्र पाठक, पुणे महानगरचे अध्यक्ष डाॅ. क. कृ. क्षीरसागर, समितीचे सचिव संदीप परांजपे तसेच रूबी हाॅल च्या इंटेन्सिव केअरच्या प्रमुख व भा.इ.सं.स च्या मार्गदर्शिका डाॅ. प्राची साठे , प्रमुख वक्त्या डाॅ. जास्वंदी वांभूरकर, बकुळ तांबट नर्सिंग महाविद्यालयांच्या उपप्राचार्या डाॅ. शुभदा पोंक्षे, समितीच्या महिलाप्रमुख शिल्पा वाडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा आरंभ गणेशवंदना नृत्याने झाला. महर्षी कर्वे, बाया कर्वे व डाॅ. आनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थी चमूने आनंदीबाई यांच्या जीवनावरील नाट्यप्रवेश सादर केला.
 
सालाबादप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी करत मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या महिला डाॅक्टरांचा यथोचित गौरव केला गेला. सन्मानचिन्ह, शेला, श्रीफळ व आनंदीबाईच्या जीवनावरील भारतीय इतिहास संकलन समिती संकलित, प्रकाशित 'अप्रकाशित साधनांतून दिसणारे आनंदी गोपाळ' ग्रंथ प्रत्येकीस प्रदान करण्यात आला. डाॅ. आनंदीबाई गोपाळ स्मृतीदिन प्रीत्यर्थ गतवर्षीपासून सुरू केलेली निबंध स्पर्धा या वर्षीही घेण्यात आली. यंदाही महाराष्ट्रातील विविध शहरातून एकूण 73 निबंध आले. सदर कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस, पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात आले. या बरोबरच भा.इ.सं.समितीच्या मार्गदर्शन डाॅ. प्राची साठे यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शेला, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन व आभार प्रदर्शन डाॅ. शिवानी लिमये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. वंदना केंजळे यांनी केले. कार्यक्रमांची सांगता पसायदानाने झाली.