चव्हाणांनंतर काँग्रेसचे अनेकजण...; मुनगंटीवारांचं सूचक विधान

    30-Mar-2024
Total Views |
 
Sudhir Mungantiwar
 
नागपूर : काँग्रेसचा मोठा नेता आमच्या पक्षात आला तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल. काँग्रेसचे अनेक जण आमच्याकडे येणार आहेत, असा विश्वास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी शनिवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
 
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "राजकारण म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. इथे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास असे म्हणत सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. राजकारण ही एक प्रवाही गोष्ट आहे. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक जिंकण्याचं मशीन बनवायचं आहे का? समरसता आणि देशाच्या विकासाचा प्रवाह वेगवान व्हावा यासाठी एक से भले दो, दो से भले चार यात वाईट काय आहे?"
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! विजय शिवतारेंची बारामती लोकसभेतून माघार
 
"दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षात आलं तर आपणच मोठे होतो. त्यामुळे उद्या काँग्रेसचा मोठा नेता आमच्या पक्षात आला तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल. काँग्रेसचे अनेक जण आमच्याकडे येणार आहेत. अशोक चव्हाण आलेत आता बाकीही येणार आहेत," असा दावा त्यांनी केला.
 
प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले की, "सहानुभूती एवढे वर्ष कधीही राहत नाही. सहानुभूतीवर मतदान झालं असतं तर राजीव गांधींच्या हत्येनंतर आजही सहानुभूती राहिली असती. सहानुभूती ही विकास कामांची असते. मी माझ्यासाठी निवडणूक लढवत नाही. मी जनतेच्या विजयासाठी निवडणूक लढवत असून दीन दुर्बलांसाठी माझी निवडणूक आहे. मला संधी दिल्यास मी अनेक कामं करुन दाखवेन," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "नाराज असलं म्हणून काय झालं? मी..."; अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण
 
उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला!
 
"प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलतात. उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. प्रकाश आंबेडकरांना आता त्याचा अनुभव येत आहे. उद्धवजींवर आम्ही विश्वास ठेवत नाही. बाकीच्यांमध्येही लवकर सुधारणा झाली तर बरं होईल. आमच्या तिन्ही नेत्यांचं एकमेकांवर प्रेम आहे," असेही ते म्हणाले.