पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार जाहीर! वाचा संपूर्ण यादी

    30-Mar-2024
Total Views |
 
Jayant Patil
 
मुंबई : लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता निवडणूकीला काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी ही यादी जाहीर केली.
 
शरद पवार गटाने आपल्या पहिल्या यादीत पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीनुसार, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तसेच बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच लवकरच दुसरी यादीही जाहीर करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.