नवाब मलिक रुग्णालयात दाखल! श्वसनाचा त्रास

    30-Mar-2024
Total Views |

Nawab Malik 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नवाब मलिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार जाहीर! वाचा संपूर्ण यादी
 
नवाब मलिकांच्या मुलीने याबाबत माहिती दिली आहे. नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान, सध्या ते वैद्यकीय कारणास्तव जामीनावर बाहेर आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित एका प्रकरणात नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात आहेत हे त्यांनी जाहीर केले नव्हते. मात्र, विधिमंडळ अधिवेशनात ते सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने ते अजित पवार गटात असल्याचे बोलले जात होते.