लिव्ह इन पार्टनरची गळा आवळून हत्या; मिनाझुद्दीन म्हणतो- ती लग्न करायचा हट्ट करायची

    30-Mar-2024
Total Views |
Man murders live-in partner

पालघर : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात २२ वर्षीय तरुणीची तिच्या लिव्ह-इन पार्टनर मिनाझुद्दीन अब्दुल अझीझ मुल्ला याने हत्या केली. पोलिसांनी त्याला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. तरुणीने लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर मुल्लावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यामुळे मुल्ला यांने तिचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. या प्रकरणी पोलीसांनी सांगितले की, दि.२९ मार्च रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात एका भाड्याच्या खोलीत मुलीचा मृतदेह सापडला होता. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, दि. १५ मार्च रोजी डहाणू येथील चाळीत असलेल्या एका खोलीत अनिशा बर्स्ता खातून नावाच्या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. यामध्ये ती तिच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत राहत होती.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर याप्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.एसपी पाटील म्हणाले, “डहाणू विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले असून त्या तपासाचे नेतृत्व करत आहेत. तपासादरम्यान २६ वर्षीय मिनाजुद्दीन अब्दुल अजीज मुल्ला हा तरुणीसोबत राहत असल्याचे आढळून आले. त्यांने रवींद्र रेड्डी या नावाने रुम भाड्याने घेतली होती आणि मृत तरुणी आपली पत्नी असल्याचे त्याने सांगितले होते.

मुल्ला हा पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचेही तपासात समोर आले आहे. मृत तरुणीही त्याच ठिकाणची रहिवासी होती. मुलीची हत्या केल्यानंतर मुल्ला फरार झाला. यावेळी मुलीचा मृतदेह कुजायला लागल्यावर शेजाऱ्यांनी खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करून खोली मालकाला माहिती दिली.मालकाने खोली उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा उघडला असता आतमध्ये मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर डहाणू पोलिस स्टेशनचे एक पथक आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले.

एसपी पाटील म्हणाले की, सात दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर २२ मार्च २०२४ रोजी पोलीसांच्या पथकाने मुल्लाला पकडले. त्याला पालघर न्यायालयात हजर केले असता, त्याला २ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. एएसपी पंकज शिरसाट म्हणाले की, आरोपीने पीडितेची हत्या केली कारण ती त्याच्याशी लग्न करण्याचा आग्रह करत होती. त्याचवेळी मुल्लाला तिच्याशी लग्न करायचे नव्हते.