हंस राज हंस यांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी, भाजपची आठवी यादी जाहीर!

    30-Mar-2024
Total Views |
Hans Raj Hans BJP Candidates


नवी दिल्ली :   भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत ओडिशाच्या तीन, पंजाबच्या सहा आणि पश्चिम बंगालच्या दोन लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबमध्ये दिनेश सिंग 'बब्बू' गुरुदासपूरमधून, तरणजीत सिंग संधू अमृतसरमधून, सुशील कुमार रिंकू जालंधरमधून, हंस राज हंस फरीदकोटमधून, प्रनीत कौर पटियालामधून निवडणूक लढवणार आहेत.
ओडिशाच्या जाजपुरमधून डॉ. रविंद्र बेहरा, कंधमालमधून सुकांत मुजूमदार पाणिग्रही आणि कटकमधून भर्तृहरी महताब यांचा उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये डॉ. प्रणत टुडू आणि बीरभूम येथून देबाशीष धर यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सहावी यादीत तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. राजस्थानसाठी दोन आणि मणिपूरसाठी एका उमेदवाराची नावे यादीत जाहीर करण्यात आली. भाजपने इंदू देवी जाटव यांना राजस्थानच्या करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघातून आणि कन्हैया लाल मीना यांना दौसामधून उमेदवारी देण्यात आली. याशिवाय इनर मणिपूर विधानसभेच्या जागेवरून थौनाओजम बसंत कुमार सिंह यांच्यावर दावेदारी करण्यात आली.