१०० टक्के मतदान होणारे देशातील एकमेव मतदान केंद्र; कारण ऐकून थक्क व्हाल!

    30-Mar-2024
Total Views |
From Gir forest for lone voter to village on Indo-Bangla border

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुक आयोगाने ही जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज आपण एका विशेष मतदान केंद्रबद्दल जाणून घेऊ. जिथे प्रत्येक वेळी १०० टक्के मतदान होते. कारण या मतदान केंद्रात मतदान करणारी व्यक्ती एकच आहे. विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीत हेच चित्र असते. आम्ही गुजरात राज्यात असलेल्या असाच एका मतदान केंद्राबद्दल बोलणार आहोत.हे विशेष मतदान केंद्र गीर सोमनाथ जिल्ह्यातील बानेज गावात आहे. इतर मतदान केंद्रांवर साधारणपणे सरासरी एक ते दोन हजार नोंदणीकृत मतदार असतात. पण गीर सोमनाथच्या बानेज गावातील हे मतदान केंद्र असे आहे की जिथे फक्त एकच मतदार मतदान करतो. विशेष म्हणजे, या एका मतदारासाठी दर निवडणुकीत मतदान केंद्र उभारले जाते. तसेच कर्मचाऱ्यांची, सुरक्षा व्यवस्थेची सोय केली जाते. आणि त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात ज्या इतरत्र केल्या जातात.

बानेज हे गाव गीर गाढा तालुक्यात आहे. येथे जामवाला गीरपासून २५ किलोमीटर अंतरावर गंगेश्वर महादेव मंदिर हे पौराणिक मंदिर आहे. या मंदिराचे महंत संत हरिदास हे या मतदान केंद्राचे एकमेव मतदार आहेत. त्यांच्याशिवाय येथे कोणीही मतदान करत नाही. याशिवाय भौगोलिक परिस्थितीमुळे येथे काम करणे अवघड आहे, परंतु तरीही देशातील इतर मतदारांप्रमाणे त्यांच्यासाठीही सर्व व्यवस्था केली जाते.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २००२ पासून प्रत्येक वेळी एक मतदान केंद्र उभारण्यात आले.यंदाही तयारी सुरू झाली आहे. नुकतेच गीर सोमनाथचे जिल्हाधिकारी दिग्विजय सिंह जडेजा यांनी मतदान केंद्राला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. याठिकाणी त्यांनी मंदिरातील स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतला आणि जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी डीडी जडेजा म्हणाले, “महंत यांचे कायमस्वरूपी निवासस्थान येथे आहे, म्हणून आम्ही तेथे वन कार्यालयात मतदान केंद्र उभारले आहे, जेणेकरून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा त्यामागचा हेतू असल्याचे ते म्हणाले. या मतदान केंद्रावर पीठासीन अधिकारी, पोलिंग एजंट, शिपाई, सीआरपीएफ जवानांसह एकूण १५ कर्मचारी असतील. मतदान प्रक्रिया कोण पूर्ण करेल.त्यात आता महंत हरिदास हेच येथील मतदार आहेत. २०१९ पासून ते मतदान करत आहेत. त्यांचे गुरू महंत भरत दास २०१९ पूर्वी मतदान करायचे. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीतही येथे मतदान झाले होते. विशेष म्हणजे येथे प्रत्येक वेळी १०० टक्के मतदान होते, कारण महंत नेहमी मतदान करतात. विशेषत: त्यांच्यासाठी उभारलेले मतदान केंद्र पाहून ते कधीही मतदान करण्यास मागे हटले नाहीत. अशा स्थितीत यावेळीही १०० टक्के मतदानाची हमी असल्याने महंत हरिदास यांनीही या निवडणुकीत मतदानाची तयारी दर्शवली आहे.