परदेशी गुंतवणूकदारांची बाजारात मांदियाळी शेअर बाजारात दिवाळी

एफपीआय ची एकूण ३.४ लाख कोटींची भारतीय इक्विटी बाजारात गुंतवणूक

    30-Mar-2024
Total Views |

Foriegn Investors
 
मुंबई: गेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूकीत फायदा झालेला असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.देशातील परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीची संख्या आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 
गेल्या वर्षभरात परदेशी गुंतवणूकदारांनी २ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. व्यवसायासाठी पोषक वातावरण, इज ऑफ डुईंग बिझनेस याशिवाय शेअर बाजारातील नैसर्गिक वाढ यामुळे गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी गुंतवणूकीत कल दिल्याचे चित्र आहे.
 
तज्ञांच्या मते येणाऱ्या काळात या गुंतवणूकीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेसटर (FPIs) ने इक्विटी बाजारात २.८ लाख कोटीची गुंतवणूक केली आहे. याशिवाय डेट मार्केटमध्ये (Debt Market) मध्ये १.२ लाख कोटीची गुंतवणूक केली आहे.
 
डिपोझिटरीकडे असलेल्या माहितीनुसार, या परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण ३.४ लाख कोटींची गुंतवणूक भारतात केली आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये सर्वाधिक भारतीय इक्विटी बाजारातून ३७६३२ कोटी रुपयांची जावक परदेशी बाजार झाली होती. त्यामुळे भारतीय बाजारासाठी २०२३-२४ वर्ष गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून लाभदायक ठरले आहे.