नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार का? काय म्हणाले भुजबळ?

    30-Mar-2024
Total Views |
 
Chhagan Bhujbal
 
नाशिक : लोकसभा निवडणूकींना काहीच दिवस शिल्लक असताना सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करताना दिसत आहेत. अशातच नाशिक लोसकभा लढवण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी संकेत दिले आहेत. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "तिकीटासाठी माझा आग्रह नव्हता. मागणीसुद्धा नव्हती. परंतू, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांबरोबर महायूतीच्या नेत्यांची चर्चा झाली. त्यावेळी अचानक माझं नाव पुढे आलं आणि भुजबळांनी नाशिकमधून उभं राहावं असं सांगण्यात आलं. आम्हाला याची काहीही कल्पना नव्हती."
 
हे वाचलंत का? -  मनसेसोबत युतीचं काय झालं? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
 
"आम्ही होळीसाठी मुंबईवरून नाशिकला निघालो असताना अर्ध्या वाटेतून परत गेलो. त्यानंतर आम्हाल याबद्दल सांगण्यात आलं. त्यावेळी मी विचार करण्यासाठी एक दिवस मागितला. अजितदादा आणि आमच्या वरिष्ठांशी चर्चा केली. तसेच याबाबत फडणवीसांशीही मी चर्चा केली. हे खरं आहे आणि तुम्हालाच उभं राहावं लागेल असं मला सांगण्यात आलं," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "नाशिकच्या उमेदवारीसाठी सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांचा आग्रह आहे. त्यामुळे याबाबत तिथे काही चर्चा सुरु आहेत. पण जो निर्णय देतील तो मला मान्य आहे आणि महायूतीसाठी आम्ही एकजूटीने काम करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा सोडल्यास अर्थात त्याच पक्षाचं चिन्ह राहणार आहे," असेही ते म्हणाले.