'या' राज्यात बिनविरोध निवडणूक! भाजपचे आठ उमेदवार विजयी

    30-Mar-2024
Total Views | 200
Arunachal Pradesh Assembly Election



नवी दिल्ली :     अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षांच्या काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आणि काहींचे अर्ज फेटाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
 
पेमा खांडू सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यापूर्वी २०११ मध्ये त्यांनी मुक्तो जागेवरून पोटनिवडणूक बिनविरोध जिंकली होती. त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.


हे वाचलंत का? - पशुपती पारस यांचे बंड शमले!


अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मुक्तो विधानसभा मतदारसंघातून पेमा खांडू, जिरो मतदारसंघातून जागेवरून एर हेज आप्पा, रोईंगमधून मुच्छू मिठी, सगली येथून एर रतु टेची, इटानगरमधून तेची कासो, तालीमधून जिक्के ताको, तालीहा येथून न्यातो दुकोम, हायुलियांग विधानसभा मतदारसंघातून दसांगलू पुल हे विजयी झाले. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीकरिता अंतिम मुदत दि. २७ मार्चपर्यंत देण्यात आली होती.

अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सहा जागांवर बिनविरोध विजय मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह अन्य ५ उमेदवारांची बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलल्या राज्यातील विधानसभा निवडणुका दि. १९ एप्रिल रोजी पार पडणार असून एकूण ६० जागांपैकी ५ मतदारसंघात भाजपकडूनच उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे.
 


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121