सरकारी ई मार्केट जीईएमवरील विक्रीत ४ लाख कोटींहून अधिक वाढ

सरकारी अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केले स्पष्ट

    30-Mar-2024
Total Views |

E Government
 
मुंबई: सरकारच्या ई मार्केट जीइएमला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या ई मार्केट जीइएम (E Market GeM) पोर्टलमार्फत खरेदी विक्रीत मोठी वाढ झाली आहे. विविध सरकारी मंत्रालय विभागाकडून ही खरेदी गेल्या आर्थिक वर्षात ही उलाढाल ४ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सरकारी अधिकाऱ्यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
 
९ ऑगस्ट २०१६ रोजी केंद्र सरकारने 'गव्हर्नमेंट ई मार्केटचे 'अनावा्रण केले होते. सरकारी विभागासाठी खरेदी विक्रीसाठी या पोर्टलचे उद्घाटन केले गेले होते. २०२१-२२ मध्ये वस्तुंच्या खरेदीची संख्या १.०६ लाख करोडपर्यंत पोहोचली होती. मागील आर्थिक वर्षात ही संख्या २ लाख करोडपर्यंत पोहोचली होती.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ही संख्या २.५ लाख करोड इतकी पोहोचली आहे.
 
या पोर्टल्ससाठी ६३००० हून अधिक सरकारी संस्था असू़न ६२ लाखांहून अधिक विक्रेते या पोर्टलचवर कार्यरत आहेत. या पोर्टलवर स्टेशनरी,ऑटोमोबाईल, संगणक,फर्निचर अशा विविध प्रकारचे उत्पादने व्यापारासाठी उपलब्ध असतात.
 
उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, बिहार, आसाम आणि उत्तराखंड या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी चालू आर्थिक वर्षात महत्त्वपूर्ण खरेदी ऑर्डर दिल्या आहेत. यात खरेदी १.५ लाख अधिक सरकारी ग्राहकांना १२०७० उत्पादने यावर उपलब्ध आहेत.