“रणदीप हुड्डा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय”, सुबोध भावेची विशेष पोस्ट

    29-Mar-2024
Total Views |
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट मराठीतही प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे आणि सुबोध भावे यांचे एक वेगळे नाते आहे.
 
 subodh bhave 
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्च रोजी हिंदीत प्रदर्शित झाला. आज म्हणजेच २९ मार्च रोजी मराठीत देखील रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी सावरकरांची भूमिका साकारली असून त्यांना मराठमोळा अभिनेता सुबोध (Subodh Bhave) भावे याने रणदीप यांना सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी मराठीत आवाज दिला आहे. याबद्दल सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी खास पोस्ट करत रणदीप हुड्डा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहेत, असे म्हटले आहे.
 
"सुबोध भावे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आजपासून सर्वत्र सावरकर हा चित्रपट मराठीमध्ये प्रदर्शित होत आहे. आदरणीय सुधीर फडके यांची निर्मिती असलेल्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटात मी एका ब्रिटिश पोलिस ऑफिसरची छोटीशी भुमिका केली होती. आणि आज रणदीप हुड्डा अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या सावरकरांच्या भूमिकेला मराठीमध्ये आवाज देण्याची संधी मला मिळाली."
 

subodh bhave 
 
सुबोध भावे पुढे लिहितात, "आवर्जून हा चित्रपट पाहा. केवळ विनायक दामोदर सावरकर नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केलेल्या असीम त्यागाची ही कहाणी. ही प्रखर देशभक्त सावरकरांची कहाणी. रणदीप यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला एक अभिनेता म्हणुन मनापासून सलाम."
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला होता की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तीरेखा साकारताना त्यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा मी चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारताना अनुभवली. देशासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो जगासमोर आला पाहिजे याच अट्टहासामुळे मी या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील करण्याचा निर्णय घेतला”.
 
रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी चित्रपटाला अभिनेता सुबोध भावे याने सावरकरांच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, रणदीप हुड्डा, संदीप सिंह आणि योगेश राहर यांनी केली असून रुपा पंडित, सॅम खान, अनवर अली, पांचाली चक्रवर्ती यांनी सह निर्मिती केली आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या प्रमूख भूमिका साकारल्या आहेत.