ज्येष्ठ गायक कमलेश अवस्थी काळाच्या पडद्याआड

29 Mar 2024 13:14:07
'व्हॉईस ऑफ मुकेश' अशी ओळख संगीत विश्वात निर्माण करणारे अवस्थी यांचे निधन
 

kamlesh awasthi  
 
मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 'व्हॉईस ऑफ मुकेश' म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गायक डॉ. कमलेश अवस्थी (Kamlesh Awasthi) यांचे निधन झाले आहे. अहमदाबाद येथे २८ मार्चला राहत्या घरात कमलेश यांनी अखेरचा श्वास घेतला. कमलेश (Kamlesh Awasthi) यांच्या निधनामुळे संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.
 
कमलेश यांनी 'नसीब' या चित्रपटात गायलेलें 'जिंदगी इम्तिहान लेती है' गाणे अधिक लोकप्रिय आहे. कमलेश यांनी हिंदीसह गुजराती चित्रपटांतही गाणी गायली आहेत. राज कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'गोपीचंद जासूस'मध्ये त्यांनी पार्श्वगायन केले होते. दरम्यान, राज कपूर यांनी कमलेश यांच्या गायनाचा आदर व्यक्त करत देशाला पुन्हा मुकेश परत मिळाला असे म्हटले होते. यानंतर कमलेश यांची ओळख 'व्हॉईस ऑफ मुकेश' अशी झाली.
 
 
 
कमलेश अवस्थी यांचा जन्म १९४५ साली सावरकुंडला येथे झाला होता. त्यांनी भावनगर विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केले. कलागुरू भरभाई पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली भावनगर सप्तकला येथे त्यांनी संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी आपला पहिला म्युझिक अल्बम 'ट्रिब्युट टू मुकेश' हाच भेटीला आणला होता.
Powered By Sangraha 9.0