कुणी येणार गं! कार्तिकी गायकवाड होणार आई...

    29-Mar-2024
Total Views |
कार्तिकी गायकवाडच्या घरी येणार नवा पाहूणा. डोहाळ जेवणाचा व्हिडीओ पाहिलात का?
 

kartiki  
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांची आवडती गायिका ठरली. आजवर अनेक गाण्यांना कार्तिकिने आवाज दिला आहे. आता मराठी कलाविश्वातील या लोकप्रिय गायिकेकडे (Kartiki Gaikwad) तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच कार्तिकी गायकवाड आई होणार असून तिच्या डोळाळं जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर लोकांचे लक्ष वेधत आहेत.
 

kartiki  
 
कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या चिमुकल्यां आगमन होणार आहे. तिच्या डोहाळ जेवणाची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. कुणीतरी येणार येणार गं! असा कॅप्शन लिहित एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
 

kartiki post 
 
दरम्यान, कार्तिकी आणि रोनित यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. हे जोडपं नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतं. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील गोड क्षण ते कायमच शेअर करत असतात आणि आता त्यांनी ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. रोनितबद्दल सांगायचे झाल्यास तो एक व्यावसायिक असून पुण्यात स्थायिक आहे.