६० वर्षांची साथ सुटली...ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन

    29-Mar-2024
Total Views |
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे दु:खद निधन, पोस्ट करत दिली माहिती.
 

shubha khote 
 
मुंबई : अनेक दशके मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उलटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे (Shubha Khote) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पती दिनेश बलसावर यांचे निधन झाले आहे. दिनेश यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शुभा खोटे (Shubha Khote) यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकांऊटवरुन अत्यंत भावूक पोस्ट आपल्या पतीसाठी लिहित ६० वर्षांची साथ तुटली असे लिहिले आहे.
 
दिनेश बलसावर यांच्या निधनानंतर शुभा खोटे यांनी पोस्ट केली आहे की, “साठ वर्षे आम्ही एकमेकांना सांगितले, की सोबत म्हातारे होऊ. उत्तम जीवन जगू. अलविदा, सोबती”. तर, अभिनेत्री भावना बलसावर ज्या देख भाई देख या मालिकेसाठी प्रसिद्ध आहेत त्या शुभा आणि दिनेश यांच्या कन्या आहेत. भावना यांनी देखील एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या लिहितात, “अतिशय साहसी आणि धाडसी असलेले दिनेश बलसावर हे आणखी या जगाला मागे सारत एका प्रवासाला निघाले आहेत. मात्र, त्यांच्या या प्रवासातील किस्से ते आम्हाला सांगू शकत नाही”, अशी भावूक पोस्ट भावना यांनी लिहिली आहे.
 
दरम्यान, शुभा खोटे यांचे पती दिनेश हे देखील चित्रपटसृष्टीशी निगडित होते. एक निर्माता म्हणून त्यांनी बराच काळ गाजवला. हिंदी आणि मराठी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘चिमुकला पाहुणा’ हा देखील त्यांच्या निर्मितींपैकी एक होता.