होळी खेळण्याच्या बहाण्याने 'इनमुल अली'ने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    29-Mar-2024
Total Views |
 Minor Rape
 
दिसपूर : आसाममधील गुवाहाटीमध्ये होळी खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. येथे तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या दोन मित्रांसह होळी खेळण्यासाठी बोलावून कारमध्ये बसवून घेऊन गेले. यावेळी पीडितेला चालत्या कारमध्ये नशा करून बेशुद्ध केले आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना घडली.
 
चालत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीला दारूच्या नशेत बसवून बलात्काराची ही घटना घडवणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव इनमुल अली असून तो फरार झाला आहे. त्याचवेळी त्याचे दोन्ही साथीदार राजू अली आणि मंडल अली यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना गुवाहाटीच्या काहिलीपाडा भागात घडली. भागदत्तपूर पोलीस चौकी परिसरात दि. २५ मार्च २०२४ रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी इनामुल अली, राजू अली आणि मंडल अली एका इनोव्हा कारमधून भागदत्तपूरला पोहोचले. येथून होळी खेळण्याच्या बहाण्याने या तिघांनी तीन मुलींना आपल्या गाडीत बसवले, त्यात एक अल्पवयीनही होती.
 
यावेळी वाटेत तिन्ही आरोपींनी मुलींना दारू पाजली, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या, त्यानंतर एनामुलने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. एनामुलने कारमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांसमोर आणि इतर दोन मुलींसमोर हा बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.तोपर्यंत दोन्ही मुली शुद्धीवर आल्या होत्या. बलात्काराचा व्हिडिओ बनवल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
 
 
बलात्कारानंतर पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिघांनी तिला घरी सोडले. पीडितेची बिघडलेली प्रकृती पाहून कुटुंबीयांनी तिला गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये (जीएमसीएच) नेले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही बाब तेथे उघडकीस आली, त्यानंतर पोलीस पथकाने मंडल अली, इनामूल आणि राजू अली यांच्याविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल अली याला आजरा येथून तर राजू अली याला हातीगाव येथून अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी इनमुल अली हा फरार असून त्याच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास आणि इतर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसह समुपदेशन केले जात आहे.