२०२४ मधील पहिल्या तिमाहीत शेअर बाजारात जबरदस्त वाढ ! मिडकॅप व स्मॉलकॅपची कमाल

मिडकॅप मध्ये ६२.९७ व स्मॉलकॅपमध्ये ६०.७६ टक्क्याने वाढ

    29-Mar-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण
 
मुंबई: पहिले आर्थिक वर्ष गुंतवणूकदारांसाठी भरभराटीचे राहिले आहेत.आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मार्च अखेरपर्यंत मिडकॅप व स्मॉलकॅप समभागात जबरदस्त वाढ पहायला मिळाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमधील झालेल्या वाढीमुळे बाजारातील कंपनीच्या गुंतवणूकत मोठी भर पडली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात शेअर बाजारात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या मांदियाळीने सेन्सेक्स निफ्टीत मोठी वाढ झाली आहे.
 
बीएससी (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) व एनएससी (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) दोन्हीत मोठी वाढ झाली आहे. बीएसीत मिडकॅप मध्ये ६२.९७ टक्क्यांची व स्मॉलकॅपमध्ये ६०.७६ टक्क्याने वाढ झाली आहे. एनएससीत निफ्टी मिडकॅप १५० मध्ये ५५.७६ टक्क्याने व स्मॉलकॅप २५० ६३.४४ टक्क्याने वाढला आहे.निफ्टी ५० व सेन्सेक्समध्ये गेल्या वर्षात अनुक्रमे २८ % व २५ % ने वाढ झाली आहे.
 
भारतातील गुंतवणूकीत वाढलेली मागणी, वाढलेले उत्पादन, वाढलेला जीडीपी दर आणि वाढलेली परदेशी व देशांतर्गत गुंतवणूक व सरकारने केलेल्या भांडवली खर्चात (Capital Expenditure) मध्ये वाढ केल्याने त्याचा एकत्रित परिणाम बाजारात सकारात्मक दिसून येत आहे याआधी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सेन्सेक्स मध्ये ६८ टक्के व निफ्टीत ७१ टक्क्याने वाढली आहे. तज्ञांच्या मते गुंतवणूकीत वाढ होता बाजारातील तरलता कायम राहिली असल्याने ही वाढ झाली आहे.
 
नुकतेच एस पी ग्लोबलने आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये भारताचा विकासदर ६.८ टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. काल सेन्सेक्स मध्ये १२०० गुणांनी रॅली दिसून काल सेन्सेक्स ७३६५१ व निफ्टी २२३२६ पर्यंत पोहोचला होता. वाढलेल्या गुंतवणूकीत मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक वाढल्याने शेअर बाजारात मोठी रॅली पहायला मिळाली आहे.परदेशी गुंतवणूकीबरोबरच देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात २५००० कोटी रुपये बाजारात गुंतवले होते.
 
गेल्या वर्षी एनएससीवरील गुंतवणूकदारांमध्ये ९ कोटी सदस्यांची वाढ झाली आहे . एकूण गुंतवणूकीपैकी २०२३ आर्थिक वर्षात ४० टक्के वाटा हि मिड कॅप व स्मॉलकॅपचा राहिला होता.आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये १९.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. मार्चमध्ये ५० टक्क्यांहून अधिक परतावा स्मॉलकॅपमध्ये मिळाला होता.