आज गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजार बंद राहणार!

एमसीएक्सदेखील आज बंद राहणार

    29-Mar-2024
Total Views |

Stock Market
 
मुंबई: आज गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. आता बीएसी (BSE) व एनएससी (NSE) दोन्ही सोमवारी नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे. शेअर्स, बाँड, कमोडिटी मार्केट हे आज बंद राहणार आहेत.
 
बीएससी व एनएससीवर बरोबर एमसीएक्स, एनसीडीएक्स व बाँड मार्केट बंद १ एप्रिलला उघडणार आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार रोख, डेरिएटिव, सिक्युरिटी आदानप्रदान हे आज बंद राहणार आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)आज सकाळी व संध्याकाळी दोन्ही सत्रात बंद राहणार आहे. एप्रिलमध्ये ११, १७ या तारखांना देखील शेअर बाजार बंद राहील.