सोन्याच्या भावात आजही वाढ मुंबईत सोने ६८७३० रुपये पार !

एमसीएक्समधील सोने निर्देशांकात ०.१८ टक्क्याने वाढ

    29-Mar-2024
Total Views |

Gold
 
मुंबई: काल रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्यानंतर आजही सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत ६३०० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट प्रकारच्या सोन्याचे भाव ६३०० रुपये झाली असून २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति ग्रॅम ६८७३ रुपये झाले आहेत. कालच्या तुलनेत सरासरी प्रति ग्रॅमवर १३० रुपयांची वाढ झाली आहे.
 
भारतीय सराफाबाजारातील किंमती आजही मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने सोन्याच्या निर्देशांकातही वाढ झाली आहे. चेन्नई, मुंबई,दिल्ली, कोलकाता, बंगलोर, हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद अशा महत्त्वाच्या शहरातील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
 
भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम १३० रुपयांनी किंमत वाढत ६३०० रुपये झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १३०० रूपयांनी वाढत ६३००० रुपयांवर पोहोचली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत १४२ रुपयांनी वाढत प्रति ग्रॅम ६८७३ रुपये पोहोचली आहे. तर १० ग्रॅम सोने किंमत १४२० रुपयांनी वाढत ६८७३० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत १०६ रुपयांनी वाढत ५१५४ रुपयांवर पोहोचली आहे. तर १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८४८ रुपयांनी वाढ होत किंमत ४१२३२ रुपयांवर पोहोचली आहे.
 
मुंबईत सोन्याच्या किंमतीत वाढ कायम राहिली आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत १३० रुपयांनी वाढ होत सोने ६३०० रुपयांवर पोहोचले आहे तर १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
 
मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत १४२ रुपयांनी वाढत ६८७३ रुपये झाली आहे. तर १० ग्रॅम किंमत १४२० रूपयांनी वाढत ६८७३० रुपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत १०६ रुपयांनी वाढत ५१५४ रुपयांवर पोहोचली आहे. तर १० ग्रॅम सोन्याची १०६० रुपयांनी वाढत ५१५४० रुपयांवर पोहोचली आहे.
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. सोन्याच्या निर्देशांकात ०.१८ टक्क्याने वाढ होत ६७८०० पातळीवर सोने पोहोचले आहे. चांदीच्या निर्देशांकात मात्र ०.०१ टक्क्याने घट होत चांदी ७५०४४ पातळीवर पोहोचला.