गुंतवणूकदारांसाठी पु ना गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ येणार ?

हा आयपीओ १०० कोटीचा दर्शनी मूल्य १० रूपये प्रति शेअर

    29-Mar-2024
Total Views |

IPO
 
मुंबई: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्वेलर्स पु ना गाडगीळ (P N Gadgil) ज्वेलर्सने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे (Security Exchange Board of India) अर्ज केलेला आहे. अधिकृत माहितीनुसार, या आयपीओत प्रत्येकी समभागांची (शेअर्स) दर्शनी मूल्याने १० रुपयांप्रमाणे ११०० कोटी रुपये उभे करणार आहे. यातील ऑफर फॉर सेलसाठी एकूण २५० कोटी रुपयांचा हिस्सा राखीव ठेवला जाणार आहे. राहिलेल्या ८५० कोटींचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध असतील.
 
कंपनीच्या वतीने सांगण्यात आल्याप्रमाणे कंपनीला आपल्या विस्तारासाठी व महाराष्ट्रात नवी १२ दालने सुरू करण्यासाठी या आयपीओतून मिळालेल्या निधीचा विनिमय करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीची ३२ ज्वेलरी दालने महाराष्ट्रभर व गोव्यात असून महाराष्ट्रातील १८ शहरात पु ना गाडगीळ समुहाचे अस्तित्व आहे. कंपनीचे अमेरिकेत देखील एक ९५००० स्क्वेअर फूटाहून अधिक मोठे दालन आहे.
 
देशातील एक मोठा ज्वेलरी ब्रँड म्हणून पु ना गाडगीळ ज्वेलर्सला मानले जाते. कंपनीचा EBITDA (Earning Before Interest Tax Depreciation Amortization) म्हणजेच करपूर्व नफा आर्थिक वर्ष २१ ते २३ मध्ये ५६ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पीएनजी ज्वेलर्सचे इयर ऑन इयर बेसिसवर (वर्षांनुवर्षे) ७६ टक्क्याने महसूल वाढत ४५०७ कोटी रुपयांवर पोहोचला होता. सप्टेंबर २०२३ पर्यंत कंपनीचे उलाढालीतील उत्पन्न २६२८ कोटी रुपये इतके होते.
 
बाजारातील माहितीनुसार मोतीलाल ओसवाल इन्व्हेसमेंट अँडव्हायजर, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, बीओबी कॅपिटल मार्केट या कंपनीच्या आयपीओचे बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.