भारताच्या विदेशी मुद्रेत वाढ ! २२ मार्चपर्यंत ६४२.६३ अब्ज डॉलर पर्यंत साठा पोहोचला

या आठवड्यात विदेशी मुद्रा १४० दशलक्ष डॉलर्सने वाढल्या

    29-Mar-2024
Total Views |

Foreign Reserves
 
मुंबई: भारताच्या विदेशी मुद्रेत (Foreign Exchange Reserves) मध्ये सलग पाचव्या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे.विदेशी मुद्रा ६३२.६३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे. या आठवड्यात विदेशी मुद्रा १४० दशलक्ष डॉलर्सने वाढल्या आहेत. यापूर्वी देशाच्या विदेशी मुद्रा ६.४ अब्ज डॉलरवरून ६४२.४९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्या होत्या.
 
आरबीआयच्या विकली स्टॅटिस्टिकस सपलीमेंट (Weekly Statistical Supplement) या आरबीआयच्या अहवालात मार्च १५ २०२४ पर्यंत ही विदेशी मुद्रेत वाढ झाल्याचे म्हटले आहे. विदेशी मुद्रा असेट (Foreign Currency Assets) मध्ये १२३ दशलक्ष डॉलर्सने तरलता येत ही संख्या ५६८.२६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती.
 
सोन्याचा साठा ३४७ दशलक्षावरून ५१.४९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. स्पेशल ड्रोईंग राईट्स (SDR) हे ५७ मिलियन वरून वाढत १८.२२ बिलियन पर्यंत वाढले आहेत.आयएमएफ (IMF) मधील साठ्यात २७ दशलक्ष डॉलर्सवरुन ४.६५ अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे.प्रसारमाध्यमांच्या माहितीप्रमाणे यापूर्वी विदेशी मुद्रेत सर्वाधिक वाढ २०२१ मध्ये झाली होती.परंतु त्यानंतर वैश्विक संकटातील दबावाखाली सेंट्रल बँकेने रुपयांची आवक वाढवली होती.
 
परिस्थितीनुसार आरबीआयच्या निर्णयाने विदेशी मुद्रा धोरणात बदल होत असतो. डॉलरच्या खरेदी विक्री मार्फत रुपयांची तरलता संतुलित केली जाते.