हिना अली बनली संगीता! घरवापसी करत केले हिंदू प्रियकराशी लग्न

    29-Mar-2024
Total Views |
Ghar Wapasi 
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात हिना अली नावाच्या २० वर्षीय मुस्लिम मुलीने सनातन धर्मात घरवापसी केली आहे. हिनाने इस्लामचा त्याग करून सनातन परंपरेचे पालन करत महेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिनाने तिचे नाव संगीता ठेवले. संगीता बनलेली हिना अली ही सीतापूरच्या खैराबाद पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे.
 
अडीच वर्षांपासून हिनाने महेश नावाच्या तरुणाशी बोलणे सुरू केले, त्याचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. महेश हाही खैराबादचा रहिवासी आहे. हिना संगीता झाल्यानंतर दोघांनीही वैदिक रितीरिवाजानुसार एकमेकांचा हात धरला आणि सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. या विवाह सोहळ्यात वेदमंत्रांच्या गजरासह जय श्री रामचे नारेही लावण्यात आले.
 
 
हिनाचे म्हणणे आहे की, तिचे वडील ताहिर यांनी महेशसोबतच्या संबंधांना कडाडून विरोध केला होता. ते हिंदूंना काफिर म्हणतात. महेशच्या घरच्यांना संगीता आवडली आणि त्यांनी त्यांच्या नात्याला हिरवा कंदील दिला, पण वडील ताहिर यांनी याला विरोध करत त्यांच्यावर अनेक बंधने लादली. यानंतर हिनाच्या विनंतीवरून महेशने हिंदू सिंह सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास हिंदू यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर हिनाने इस्लामचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि संगीता बनून सनातन परंपरेत घरवापसी केली.
 
सीतापूर शहरातील कांशीराम कॉलनी येथील माता काली मंदिरात गुरुवारी हिना आणि महेशचा विवाह वैदिक रितीरिवाजाप्रमाणे विवाह पार पडला. यावेळी उपस्थित महेशच्या कुटुंबीयांसह हिंदू संघटनांनीही हिना आणि महेश यांना भेटवस्तू दिल्या आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. नवदाम्पत्याने पोलिसांकडे सुरक्षेची मागणीही केली आहे.