गोदरेजच्या ला'अफेरेमध्ये मलायका अरोराच्या कलेक्शनचे प्रदर्शन

गोदरेज विक्रोळी येथे होणार आज Godrej L" Affaire फॅशन शो

    29-Mar-2024
Total Views |

Malaika Arora
 
मुंबई: गोदरेजने ' गोदरेज ला' अफेरे ( L' Affaire) या प्रतिष्ठित लाईफस्टाईल प्लॅटफॉर्मच्या सहाव्या आवृत्तीत प्रसिद्ध उद्योजिका अभिनेत्री व मॉडेल मलायका अरोराचे आगमन होणार आहे. गोदरेज इंडस्ट्रीज व असोसिएटेस (Godrej Industries and Associates) ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ५० हून अधिक लाईफस्टाईल ब्रँड सहभागी होणार आहेत. आज २९ मार्चला गोदरेजच्या मुख्यालयात विक्रोळी मुंबई येथे होणार आहे.
 
या फॅशन शो मध्ये फॅशन स्टाईलिस्ट व अभिनेत्री मलायका अरोरा आपला ब्रँड 'द लेबल लाईफ' चे प्रतिनिधित्व करणार आहे. या शो मध्ये प्रथमच मलायका अरोराचे आगमन होणार असुन यात ती समर कलेक्शन २०२४ चे प्रदर्शन करणार आहे.
 
प्रदर्शनात सहभागी होण्याबाबत व्यक्त होताना,' दर लेबल लाइफ हा माझ्या हृदयाजवळचा प्रकल्प पहिल्यापासूनच आहे.रोजच्या चांगल्या ड्रेसिंग या ब्रँडचे महत्व मोठे असून दैनंदिन जीवनातील वॉर्डरोबची उंची वाढवण्यासाठी या ब्रँडचा वापर होतो. जेव्हा गोदरेज एल अफेरे यांनी मला कार्यक्रमासाठी विचारले तेव्हा माझ्या मनात ही कलेक्शन प्रदर्शनाची माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. या कार्यक्रमात हिस्सा घेताना मला खूप आनंद असून खूप उत्सुकता असून प्रेक्षकांसाठी चांगले प्रदर्शन दर्शविता येईल.' अशी प्रतिक्रिया मलायका अरोराने बोलताना दिली आहे.
 
हा इव्हेंट विचारपूर्वक आठ झोनमध्ये मॅप केला गेला आहे ज्यात L'Affaire - जीवनशैली, जागरूकता, फॅशन, फ्लेवर, कलात्मकता, नाविन्य, कायाकल्प आणि पर्यावरण या फॅशन शोची स्थापना गोदरेज L'Affair ची स्थापना दररोज जीवनातील चांगुलपणा व चांगल्या जीवनशैली साजरी करण्यासाठी झाली होती.