कॅनरा बँक कॅनरा रोबिको असेट मॅनेजमेंट कंपनीतील १३ % हिस्सा कमी करणार

29 Mar 2024 12:57:40

Canara Bank
 
 
मुंबई: कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने आयपीओ माध्यमातून उपकंपनी कॅनरा रोबिको असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Canara Robeco Management Company Limited CRAMC) आपले १३ टक्के भागभांडवल विकण्याचा निर्णयाला मान्यता दिली आहे. या कंपनीचे नोंदणीकरण करत आयपीओतून (Initial Public Offering) आपला १३ टक्के हिस्सा विक्रीतून हिस्सेदारी कमी करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
 
कॅनरा रोबिका संस्था २००७ साली स्थापन केली होती. यातील ५१ टक्के भागभांडवल कॅनरा बँकेकडे आहे. कॅनरा बँकने कॅनरा बँक म्युचल फंड मधील हिस्सा हा रोबिको ग्रुप एन वी (आताची Orix Corporation) चा नावे केला होता.
 
ऑक्टोबर डिसेंबर २०२३ तिमाहीत कंपनीची असेट अंडर मॅनेजमेंट (व्यवस्थापन अंतर्गत मालकी) ७९३६४.५५ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २३ मध्ये कंपनीला ७८.८५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. यावर्षी कंपनीने २५ टक्क्यांचा लाभांश (Dividend ) गुंतवणूकदारांसाठी जाहीर केला होता.या कंपनी व्यतिरिक्त एचडीएफसी, युटीआय, आदित्य बिर्ला सन लाईफ, निपोन लाईफ एएमसी , श्रीराम एकएमसी , आय एल एफ एस म्युचुल फंड इत्यादी शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0