ब्लू डार्टतर्फे प्रमुख महानगरांतून गिफ्ट सिटीकरिता 20 तास डिलिव्हरी सर्व्हिस उपलब्ध

बदलत्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वितरण सेवा सुरू

    29-Mar-2024
Total Views |

bluedart
 
मुंबई: ब्लू डार्ट, ही दक्षिण आशियाची जलद हवाई आणि एकात्मिक वाहतूक तसेच वितरण कंपनी असून त्यांच्या तर्फे गुजरात येथील गिफ्ट सिटीत मध्यवर्ती अस्तित्वाची घोषणा करण्यात आली. बदलत्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि भारताच्या विकास मार्गाशी सुसंगत असलेल्या नवीन सुविधेच्या उद्घाटनासह अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि अनुभवी कर्मचाऱ्यांसह सुसज्ज, ब्लू डार्टच्या गिफ्ट सिटी सुविधेमार्फत प्रमुख महानगरांमधून 20 तासांची वितरण सेवा सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे लागलीच दुसऱ्या दिवसाची डिलिव्हरी इच्छित स्थळी वितरणाची वचनबद्धता सुनिश्चित होते.
 
या विस्ताराबद्दल अधिक माहिती देताना ब्लू डार्ट’चे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मैनुअल म्हणाले, “ब्लू डार्ट’च्या गिफ्ट सिटी सुविधेचे उद्घाटन म्हणजे आमचे लॉजिस्टीक क्षेत्राची व्याख्या नव्याने रचत आमच्या प्रवासात आणखी एका नवीन मापदंडाचे महत्त्व अधोरेखित करते. आम्ही श्रेणीतील सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासोबत आमच्या सर्व ग्राहकांच्या शिपिंगविषयक गरजांसाठी पसंतीचे लॉजिस्टिक भागीदार होण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमची बाजारपेठ वाढवणे आणि जागतिक स्तरावर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या संधींचा फायदा घेणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गिफ्ट सिटीच्या समकालीन आर्थिक परिसंस्थेमध्ये ब्लू डार्ट’चा उपक्रम आम्हाला व्यवसायांना पाठिंबा देण्यास आणि आमच्या ग्राहकांसाठी मूल्यनिर्मितीच्या दिशेने सक्षम करेल.
 
ब्लू डार्ट अगदी सुलभ पद्धतीने त्यांच्या 8 बोईंग विमान ताफ्यांच्या माध्यमातून सर्व महत्त्वाच्या महानगर भागांतून अहमदाबाद येथील गिफ्ट सिटीला एक्सप्रेस कनेक्टीव्हिटीने जोडेल. याकरिता कंपनीने सर्व शिपिंग गरजांची उपलब्धतता तसेच विश्वासार्हतेची खातरजमा करत देशभर जवळपास 55,600+ ठिकाणांवर विस्तृत संपर्कजाळे तयार केले आहे. जवळपास 460 ई-वाहनांसह 12,000 हून अधिक ऑन-ग्राउंड वाहनांच्या मजबूत ताफ्यासह, देशभरात 2,253 सुविधांनी समर्थित, ब्लू डार्ट जलद आणि सुरक्षित वितरण सुनिश्चित करते. ही धोरणात्मक पायाभूत सुविधा गिफ्ट सिटीला आणि तेथून अखंडित वितरण सुलभ करून, एक्सप्रेस ग्राउंड आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्स प्रदान करण्यात ब्लू डार्टला आघाडीवर ठेवते. डीएचएल समूहाच्या डीएचएल ई-कॉमर्स सोल्यूशन्स विभागाचा भाग म्हणून जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक संपर्कजाळ्याचा लाभ घेत, ब्लू डार्ट’ने जागतिक स्तरावर 220 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये आपली व्याप्ती वाढवली आहे.
 
आपल्या व्यापक सेवा प्रस्तावांच्या माध्यमातून ब्लू डार्ट’ने सर्व पिनकोडवर त्यांच्या सेवांचा विस्तार करत भागीदारीद्वारे लघु-मध्यम उद्योग (एसएमई) आणि सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांचे सबलीकरण केले आणि देशाच्या सर्वात दुर्गम भागापर्यंत मजल मारली. आपल्या कामकाज कार्यक्षमतेच्या जोरावर ब्लू डार्ट ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणे, बीएफएसआय, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोटिव्ह यासारख्या क्षेत्रांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते.