एसेल कंपनीकडून अटॉम्स या स्टार्टअप कार्यक्रमाला सुरुवात

यामध्ये ८ स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार

    29-Mar-2024
Total Views |
 
Accel
 
 
 
मुंबई: व्हेंचर कॅपिटल कंपनी एसेल (Accel) ने उद्योगजगतात मोठी घोषणा केली आहे. भारतातील सुरुवातीच्या स्तरावर असलेल्या स्टार्टअप कंपन्यांना हाताशी घेत या समुहाचा 'अटॉम्स'(Atoms)  नावाचा उद्योजकांचा कार्यक्रम सुरू केला आहे.
 
या समूहाला एसेलची ५ दशलक्ष डॉलर्स रुपयांची मदत करण्याबरोबरच एसेलचे सदस्यत्व व विकासात्मक दृष्टिकोनातून एसेलचा संस्थापकांचे मार्गदर्शन व इतर फायदे या स्टार्टअपला मिळणार आहेत. यासंबंधीचे वृत्त एएनआयने दिले असून या नवीन उद्योजकांना या उपक्रमातून चालना मिळणार आहे.
 
या मेंबरशिपच्या माध्यमातून यापूर्वी यशस्वी झालेल्या स्टार्टअप उद्योजकांकडुन प्रेरणा मिळू शकते.यापूर्वीच्या कार्यक्रमात' Atoms' मधील भाग राहिलेल्या २४ स्टार्टअपने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत २०० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे.
 
Atoms 3.0 चा भाग असलेले Tune AI, उपक्रमांसाठी GenAI स्टॅक; स्कूब, वाचनासाठी एक जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म हे ४ एआय स्टार्टअप आहेत. यापूर्वी एसेल हे फ्लिपकार्ट, फ्रेशवर्क, स्विगी, अर्बन कंपनी क्युअर फिट, झेटवर्क या यशस्वी स्टार्टअप बरोबर भागीदार होता.
 
याविषयी बोलताना एसेलचे भागीदार प्रियांक स्वरूप म्हणाले, 'आम्हाला विश्वास आहे की आम्हाला AI आणि इंडस्ट्री 5.0 मध्ये व्यत्यय आणणाऱ्यांची पुढील वाटचालीचा रस्ता सापडला आहे आणि याचा पुरावा म्हणून कार्यक्रमात सामील झाल्यापासून या प्रत्येक स्टार्टअपच्या वाढीची कंपनी साक्षीदार आहे.'