अंबुजा सिमेंट आता अदानींची कंपनी ! ३.६ टक्क्यांवरून ६६.७ टक्के हिस्सा वाढवला

29 Mar 2024 13:57:17

Gautam Adani
 
मुंबई: अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या समुहाकडून अंबुजा सिमेंट कंपनीत ६६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.अदानी समुहाने अंबुजा कंपनीतील आपले भागभांडवल ३.६ टक्क्यांवरून ६६.७ टक्के भागभांडवल घेतले असल्याचे अदानी समुहाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
 
हरमोनिया ट्रेड व इन्व्हेसमेंट या अदानी समुहाच्या मालकीच्या कंपनीने २१.२ कोटींचे समभागांची (शेअर) प्रत्येकी ३१४ रूपयाप्रमाणे खरेदी केली आहे.बीएसीवर गुरुवारी अंबुजा सिमेंटचा समभाग १.८ टक्क्याने वाढला आहे. कंपनीच्या जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे, कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतला असून भविष्यातील आर्थिक स्थिती मजबूत राहिल व वाढीसाठी ही गुंतवणूक करून उदयोन्मुख संधीचा लाभ घेता येईल असे कंपनीने म्हटले आहे.
 
अदानी समुहाला सिमेंट व्यवसायात काही मोठी लक्ष ठेवली आहेत ज्यामध्ये समुहाला सिमेंट उत्पादनात मोठी वाढ करायची आहे. २०२२ मध्ये अंबुजा सिमेंटमध्ये प्रमोटर (संस्थापकांनी) ५००० कोटींची गुंतवणूक केली होती. २०२८ पर्यंत अदानी समुहाला १४० दशलक्ष सिमेंटची निर्मिती करण्याचे लक्ष आहे. अदानी सिमेंटमधील ६६ टक्के भागभांडवल अदानी समुहाच्या ताब्यात असल्याने अंबुजा सिमेंटच्या व्यवस्थापनात अदानी समुहाचे नियंत्रण असणार आहे.
 
गुरूवारी अंबुजा सिमेंटच्या संचालक मंडळाने २१.२ कोटी वॉरंटचे समभागात रुपांतर करण्याची परवानगी दिली होती. या अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंटचे प्रवर्तक (अदानी) आपली ११६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करतील असे या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
 
सप्टेंबर २०२२ मध्ये अदानी यांनी अंबुजा सिमेंट कंपनीतील ५१००० कोटींचा हिस्सा विकत घेतला होता.यानंतर अदानी समुहाने ओपन ऑफर माध्यमातून जास्तीचे २६ टक्के भागभांडवल खरेदी केले होते.
 
Powered By Sangraha 9.0