अकासा एअर कंपनीची आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली

मुंबई ते दोहा पहिला विमानप्रवास

    29-Mar-2024
Total Views |

Akasa Airlines
 
मुंबई: अकासा एअरलाईन्स (Akasa Airlines) ने आजपासून आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरील उड्डाणफेरी सुरू केली आहे. गुरुवारी सांगितलेल्या माहितीनुसार, प्रथम उड्डाण मुंबई ते दोहा सुरू झाले असून याशिवाय कुवेत,जेददा,रियाधकडील उड्डाणासाठी कंपनीला हक्क प्राप्त झाले आहेत.
 
येणाऱ्या काळात अकासा एअरलाईन्स आंतरराष्ट्रीय पातळीवर उड्डाणाच्या फेरीत मोठी वाढ करणार आहे.' असे अकासा व्यवस्थापनाने आपल्या माहितीपत्रकात म्हटले आहे.
 
आंतरराष्ट्रीय उड्डाणिबरोबरच देशांतर्गत फेरीत देखील ग्राहकांच्या सोयीनुसार वेळापत्रक आखल्याचे अकासाने सांगितले आहे. अहमदाबाद, गोवा, वाराणसी, दिल्ली,लखनऊ, बंगळुरू, कोची या शहरातील हवाई उड्डाणात वाढ झाली आहे.