#सांगली_काँग्रेसचीच : मविआत ठाकरेंविरोधात बंडखोरी

    28-Mar-2024
Total Views |
 
उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत अंतिम चर्चा होणे बाकी असतानाच १७ उमेदवारांची यादी जाहीर केली काँग्रेसचे इच्छुक उमेदवार  आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातु विशाल पाटील यांनी मात्र सांगली काँग्रेसचीच ( sangli congress ) असं म्हणत बंडाचा पवित्रा घेतला आहे.
vishal patil
 
मुंबई : उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत अंतिम चर्चा होणे बाकी असतानाच १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये काँग्रेस इच्छुक असलेल्या जागांवर उमेदवार दिल्याने मविआ मध्ये काँग्रेस पक्षाकडुन प्रचंड नाराजीचा सुर उमटत आहे. उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा असंही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी म्हटलं आहे. 
 
एकमत न झालेल्या जागांमध्ये सांगली लोकसभेची जागा मोठा चर्चेचा मुद्दा ठरली आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पण हा मतदारसंघ पारंपारीकरीत्या काँग्रेसचा असल्याने काँग्रेस पक्ष आणि स्थानिक कार्यर्ते नारज झाले आहेत.
 
 
काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातु विशाल पाटील यांनी मात्र सांगली काँग्रेसचीच असं म्हणत बंडाचा पवित्रा घेतला आहे. गेले अनेक दिवस आपल्या एक्स अकाउंट वरुन ते या संदर्भात पोस्ट सुद्धा करत आहेत. काहीही झालं तरी सांगलीतुन निवडुक लढवणार असा दावा त्यांनी केला आहे. सुरुवातीला ते अपक्ष निवडणुक लढवतील असा अंदाड बांधला जात होता. परंतु सांगली_काँग्रेसचीच या हॅशटॅग वरुन उबाठा गटाने फेरविचार न केल्यास विशाल पाटील महाविकास आघाडी तोडुन सांगलीतुन काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुक लढवतील असे वातावरण दिसत आहे.

 
सांगली जिल्हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, या मागणीकरता जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींसह काँग्रेस पक्षाचे नेते आणि जनरल सेक्रेटरी के.सी. वेणूगोपालजी यांची भेटही त्यांनी घेतली होती. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम सुद्धा ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. तेही यावेळी विशाल पाटील यांच्यासोबत उपस्थित होते.

 
विशाल पाटील यांनी आज २८ मार्च २०२४ ला पुन्हा आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लक्ष्य चित्रपटाच्या 'पायेगा जो लक्ष्य है तेरा' या गाण्याच्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या एक्सच्या कवर पोस्टवरही त्यांनी हम लढेंगे और जितेंगे अशा आशयाचा फोटो ठेऊन बंडाची चुणुक दिली आहे.