सई गाजवतेय बॉलिवूड! इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत दिसणार ‘या’ प्रोजेक्टमध्ये

    28-Mar-2024
Total Views |
'भक्षक' चित्रपटानंतर आता पुन्हा सई ताम्हणकर ३ नव्या हिंदी प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.
 

sai  
 
मुंबई : मिमी चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिंदी चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच सई (Sai Tamhankar) अभिनेता इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधी यांच्यासोबत नव्या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. भक्षक या नेटफिल्क्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटानंतर पुन्हा एकदा सई ओटीटीवर दिसणार आहे. 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ हे दोन्ही नवे प्रोजेक्ट्स अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहेत.
 
एक्सेल एंटरटेनमेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी तिला मिळाली असून या प्रोजेक्ट्स बद्दल सई म्हणते “एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. कायम वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर एक्सेल काम करत आणि म्हणून त्यांच्या सोबतीने काम करण्याची वेगळी मज्जा आहे आणि मला त्यांच्यासोबत तीनदा काम करण्याची संधी मिळाली याहून मोठी गोष्ट काय शकते ! ' डब्बा कार्टेल' सोबतीने " ग्राउंड झिरो " आणि " अग्नी " हे सगळेच प्रोजेक्ट्स माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग आहे "
 
तिच्या आगामी प्रोजेक्ट मधल्या खास सह-कलाकारांबद्दल सई म्हणते "इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधी यांच्या सोबतीने काम करण्याचा अनुभव खूप शिकवून जाणारा होता. इमरान आणि प्रतीक हे अप्रतिम अभिनेते आहेत. आम्ही सोबत काम करतोय आणि आता हे काम कधी एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. माझ्यासाठी ही एक स्वप्नपूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बॉलिवुड मधल्या य दोन कलाकारांच्या सोबतीने काम करण याहून मोठ काय असणार ".
 
'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई 'डब्बा कार्टेल' मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.