विधानसभेला जागेची हमी द्या तरच लोकसभेसाठी काम करु; कसबा विधानसभेच्या जागेसाठी ठाकरे गट आक्रमक

    28-Mar-2024
Total Views |
dhangekar
 
पुणे : महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाकडुन कसबा विधानसभा kasaba vidhansabha मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. आगामी लोकसभेला पुणे लोकसभा मतदारसंघातुन कसब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. ती जागा आगामी विधानलभेला ठाकरे गटाला मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 
लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये रविंद्र धंगेकरांचे काम करण्यासाठी कसब्याच्या जागेची हमी द्या आसा आग्रह ठाकरे गटाकडुन करण्यात आला आहे. या जागेची हमी दिली तरच लोकसभेला धंगेकरांसाठी काम करु असं ठाकरे गटाकडुन मविआच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे.
 
कसब्याच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे. महाविकास आघाडीने संघटनात्मक बांधणीची ताकद कसब्याच्या पोटनिवडणुकीत दाखऊन दिली आहे. रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते खासदार होतील याची खात्री आहे. त्यामुळे विधानसभेची ही जागा ठाकरे गटाला मिळावी अशी मागणी या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
 
दरम्यान, काही जागांवरुन चर्चा होणे बाकी असताना उद्दव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरु होती. आघाडी धर्माला उद्धव ठाकरेंनी गालबोट लावलं आहे अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या नेतृत्वाने व्यक्त केली आहे. अशात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते विधानसभेच्या जागा मागत असल्याने पुन्हा महाविकास आघाडीतला तणाव चव्हाट्यावर आला आहे.