"गांधी भावंडं मंगळावरुन आली आहेत", कंगनाचं बेधडक वक्तव्य

    28-Mar-2024
Total Views |
कंगना रणावत हिची राहूल आणि प्रियंका गांधीवर ‘नेपो किड्स’ म्हणत स़डेतोड टीका.
 

kangana ranaut 
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) देखील उतरली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून भाजपने तिला उमेदवारी जाहिर केली आहे. यानिमित्ताने एका मुलाखतीत कंगनाने (Kangana Ranaut) कॉंग्रेसवर टिका करत राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
 
कंगना रणावत काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाली की, "काँग्रेस हा माझ्यासाठी नेहमीच भीतीदायक पक्ष राहिला आहे. पक्षातील घराणेशाही माझ्यासाठी एक मोठी समस्या आहे. त्यांच कारण असं की माझ्या चित्रपट उद्योगात मी याच घराणेशाही व्यवस्थेचे लक्ष्य होते. मी उघडपणे त्याचा निषेध केला, त्याविरोधात लढा दिला होता. या गोष्टींमुळे नकळत माझे शोषण झाले. घराणेशाही, गटबाजी करणाऱ्या या पक्षाचा मला तिरस्कार आहे."
 
पुढे कंगनाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांचे एका ओळीत वर्णन करण्यास सांगितले गेले तेव्हा कंगनाने दोघांचेही वर्णन 'नेपो किड्स' असे केले, आणि ती म्हणाली की, "जणू काही ही भावंडं मंगळावरुन आली आहेत अशी विचित्र आहेत.” यानंतर तिने भाजपचे समर्थन करत म्हटले की, "भाजपला मी मनापासून पाठिंबा दिला आहे. पक्षाची सदस्य असो वा नसो, मी नेहमीच पक्षाच्या हितासाठी लढले आहे. मी कोणतीही कसर सोडलेली नाही. मला नेहमीच असे वाटते की माझी विचारसरणी या सरकारशी संबंधित आहे."
 
उमेदवारी मिळाल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया
 
कंगनाला पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर मतदारांचा प्रतिसाद कसा असेल? असे विचारले असता ती म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांवर आणि त्यांच्याच कर्मावर मी लोकांची पसंती मिळवेन किंबहुना निवडून देखील येईल”, असा विश्वास देखील यावेळी कंगनाने व्यक्त केला. पुढे ती कंगना असं देखील म्हणाली की, “मी वाटत नाही माझ्या नावाने, कामाने निवडून येईल आणि जिंकेल. पण पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कर्माने, त्यांच्या परिश्रमाने, त्यांच्या नावाने निवडणूक जिंकेन, असेही ती म्हणाली होती.