मंडीतून कंगनाच्या विरोधात काँग्रेस कोण उतरवणार? प्रदेशाध्यक्षांनी सांगितले!

    28-Mar-2024
Total Views |
kangana-ranaut-mandi-lok-sabha-seat-bjpनवी दिल्ली :      हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून मंडीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यातच आता विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांनी यावर भाष्य केले आहे. तरी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या खासदार तथा प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी उमेदवारीबाबत आपली भूमिका हायकमांड कळविली आहे. सध्या मंडीमधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत. प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आणि आमदार विक्रमादित्य सिंह यांच्या आई आहेत. त्या हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही आहेत.


हे वाचलंत का? - भारत – चीनदरम्यान सीमावादावर चर्चा


एकंदरीत, मंडीमधून भाजपच्या उमेदवार कंगना रनौत यांच्याविरोधात काँग्रेसला कोणाला उमेदवारी देणार याकडे स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रतिभा सिंह यांना माध्यमांनी मंडीतून निवडणूक लढवणार का? असे विचारता त्या म्हणाल्या, 'अजिबात नाही... बिलकुल नाही, मी माझा मुद्दा हायकमांडला सांगितला आहे. आता हायकमांड काय निर्णय घेते यावर सर्व काही अवलंबून आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

आता प्रतिभा सिंह यांनी उमेदवारी नाकारली असताना काँग्रेस आता मंडी मतदारसंघातून कुणाला उभे करणार हे महत्त्वाचे असेल. एकंदरीत, पक्षाकडून एका तगड्या चेहऱ्याच्या शोधात आहे, जो भाजपच्या उमेदवार कंगना रणौत यांना टक्कर देऊ शकेल. विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला असताना काँग्रेस कुणाला उमेदवारी जाहीर करतं, याकडे मंडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना उत्सुकता असेल.