पुरातत्व अभयस्क डॉ. अरविंद जामखेडकर खरी कला समजावून सांगतात तेव्हा

28 Mar 2024 15:22:56

art 
 
मुंबई : "दीडशे वर्षांपूर्वी 'खरी कला काय?' असा प्रश्न अनेकांना पडायचा. कलेत आपण अनुकरण करतो, आपली प्रेरणा काही वेगळी असते. म्हणजे कुणा ना कुणाचा कसला ना कसला प्रभाव असतोच." असे उद्गार डॉ. अरविंद जामखेडकर यांनी दै. मुंबई तरुण भारताला दिलेल्या मुलाखती काढले. जे जे कला महाविद्यलयाला अनन्य अभिमत दर्जा नुकताच प्राप्त झाला. त्यानंतर जेष्ठ पुरातत्व अभ्यासक डॉ. अरविंद जामखेडकर यांची जेजे महाविद्यालयाच्या कुलपतिपदी नेमणूक झाली. यानिमित्ताने कला आणि तिची कालसापेक्षता या विषयावर हि मुलाखत आधारित होती.
 
ते पुढे म्हणाले, "कलाकार कोणत्याही माध्यमातून स्वतःलाच मांडत असतो. ती अभिव्यक्ती आहे. मग ते शिल्प असो, चित्र असो, नृत्य असो किंवा संगीत. हे त्याच अभिव्यक्तीचं साधन असतं. हे कलेचं माध्यम मात्र त्याने अनुकरणाने स्वीकारलेलं आहे. दुसरा भाग आहे तो धर्मकल्पनांचा आहे. या धर्मकल्पना आपल्याला जुन्या काळाशी बांधून ठेवतात. कला ही नेहमी काहीतरी अभिनव करत असते, ती धर्मकल्पनांच्या विरोधात जाते म्हणजे एका अर्थी ही रस्सीखेच आहे. हा संघर्ष नेहमीच सुरु राहणार आहे. आता एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीला निवारा हवा आहे. ऊन पाऊस थंडीपासून स्वतःच रक्षण करण्यासाठी. त्याला जर ते एखादी झोपडी देत असेल पण ग्रीक स्थापत्य देऊ शकत नसेल तर कितीही सुंदर दिसणार आहे म्हणून ग्रीक स्त्रहपत्या उत्कृष्ट होऊ शकेल का? कलेला ही बंधनं पाळावीच लागतात नाहीतर तिच्यात काहीही अर्थ उरत नाही."
Powered By Sangraha 9.0