रामललाने ५०० वर्षांनंतर अयोध्येत खेळली होळी, योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान मोदींसोबत जनमत!

    28-Mar-2024
Total Views |
holi-khele-raghuveera-awadh-mein


नवी दिल्ली :    'रामललाने तब्बल ५०० वर्षांनंतर अयोध्येत होळील खेळली असून मथुरा-वृंदावनचे रस्तेदेखील या क्षणाची वाट पाहत होते, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेरठ येथील प्रबुध्द परिषदेत केले आहे. ते म्हणाले, "आम्ही 'होली खेले रघुवीरा अवध में' हे भजन खूप ऐकले आहे, परंतु पाचशे वर्षांत प्रथमच, मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी त्यांच्या धाम अयोध्येत बसून होळी साजरी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


हे वाचलंत का? - संदेशखालीत अत्याचार होत असताना टीएमसी खासदार रीलमध्ये व्यस्त!


ते पुढे म्हणाले, मथुरा वृंदावनच्या पूज्य रस्त्यांनीही वाट पाहिली असून अयोध्ये रामललाने होळी साजरी केली आहे. तसेच, अयोध्येनंतर आता मथुरेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न योगी आदित्यनाथ यांनी केला असून त्यांना मथुरा-वृंदावन धामचा विकास ज्या प्रकारे अयोध्या धामचा विकास केला जात आहे, त्याच पद्धतीने करायचा आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
 लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला मतदान करायचे याबाबत मतदारांच्या मनात कोणतीही शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्याचा संकल्प देशातील जनतेने केला असल्याचा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात पुर्ण पाठिंबा असून याबाबत मतदारांच्या मनात शंका नाही, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.