संदेशखालीत अत्याचार होत असताना टीएमसी खासदार रीलमध्ये व्यस्त!

    28-Mar-2024
Total Views |
bjp-fields-rekha-patra-on-basirhat-lok-sabhaनवी दिल्ली :    पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाची देशभरात दखल घेण्यात आली होती. आता यात एक नवी माहिती समोर आली असून टीएमसी खासदार नुसरत जहाँ रील बनविण्यात व्यस्त असल्याचे एका व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. जेव्हा खासदार नुसरत जहाँ रील बनवण्यात व्यस्त होती तेव्हा रेखा पात्रा तिच्या लहान मूल घेऊन शेख शाहजहान आणि संदेशखालीतील टोळीशी भांडत होती, असे व्हिडीओत तिसत आहे.

दरम्यान, भाजपने रेखा पात्रा यांना पश्चिम बंगालमधील बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बसीरहाट मतदारसंघ संदेशखाली परिसरात येतो. तसेच, संदेशखालीतील हिंसाचारानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काही काळापासून चर्चेतदेखील राहिल्या आहेत.


ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा तो देश मोठा; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन


दरम्यान, जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे, महिलांचे शोषण करणे यासह अनेक गुन्ह्यांसाठी शेख शहाजहान आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे बोटे दाखवली जात असताना आता भाजपने रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. रेखा पात्रा शेख शाहजहान आणि त्याच्या टोळ्यांनी केलेल्या अमानुषतेच्या विरोधात प्रतिकाराचा चेहरा म्हणून उदयास आल्या आहेत. अशी चर्चा सध्या संदेशखाली परिसरात होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे शेख शाहजहानचा निषेध करण्यासाठी भाजपच्या महिला नेत्यांच्या एका गटाला पश्चिम बंगाल पोलिसांनी संदेशखाली येथे पोहोचण्यापासून रोखले, तेव्हा रेखा पात्रा यांनी आपल्या लहान मुलीला हातात घेऊन निदर्शने करण्यात आली होती. भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी 'X' पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, “भाजपच्या बशीरहाटच्या उमेदवार रेखा पात्रा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन संदेशखाली आंदोलनात विरोध करत आहेत. त्या संयम आणि दृढनिश्चयाचा चेहरा असून मतांसाठी हिंदू महिलांना लांडग्यांकडे फेकणाऱ्या ममता बॅनर्जींच्या घृणास्पद राजकारणाच्या विरोधात त्या उभ्या ठाकल्या आहेत."