'या' सहा जागांवर बिनविरोध निवडणूक! भाजपचाच विजय

    28-Mar-2024
Total Views |
arunachal-pradesh-assembly-elections-BJPनवी दिल्ली :    अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सहा जागांवर बिनविरोध विजय मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह अन्य ५ उमेदवारांची बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलल्या राज्यातील विधानसभा निवडणुका दि. १९ एप्रिल रोजी पार पडणार असून एकूण ६० जागांपैकी ५ मतदारसंघात भाजपकडूनच उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह अन्य सहा उमेदवार विधानसभेवर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. २७ मार्च रोजी म्हणजेच शेवटच्या दिवशी इतर कोणत्याही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने सदर जागांवर बिनविरोध निवडणुकीची शक्यता बळावली आहे.


हे वाचलंत का? - रामललाने ५०० वर्षांनंतर अयोध्येत होळी खेळली, योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान मोदींसोबत जनमत!


मुख्यमंत्री खांडू म्हणाले, राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघात आमच्या पक्षाकडून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. आम्ही आशा करतो की अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काही जागा सोडल्या जातील, असेही मुख्यमंत्री खांडू म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री खांडू यांच्या मुक्तो मतदारसंघातून चौथ्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहेत. आता विधानसभेच्या ६० जागांकरिता एकूण १९७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतात कारण इतर कोणत्याही उमेदवारांनी त्या जागेकरिता अर्ज दाखल केलेला नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.