मिड रेंज वन प्लसचा Nord CE 4 लवकरच भारतात येणार

मिडरेंज फोनमध्ये फ्लॅगशिपचा अनुभव

    28-Mar-2024
Total Views |
 
One Plus Nordce4
मुंबई: वन प्लस कंपनीने आपल्या सुरूवातीच्या काळात कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स हा ट्रेंड सुरू केला होता. त्यानंतर मार्केट डिस्ट्रपटर ठरल्यानंतर अनेक कंपन्यानी वन प्लस कंपनीला अनुसरून आपले नवे स्मार्टफोन लाँच केले.त्यानंतर उत्पादनांच्या वाढत्या खर्चासोबत मोबाईलच्या किंमती वाढल्या त्यामुळे वन प्लस चाहत्यांना कमी किंमतीत चांगला फोन मिळावा अशी अपेक्षा होती. नेमके हेच जाणत वन प्लसने आपल्या मिडरेंज सेगमेंटमध्ये नवीन फोन आणला आहे. कंपनी लवकरच वनप्लस नोर्ड सीई ४ बाजारात लवकरच दाखल होणार आहे.बाजारातील तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा स्मार्टफोन १ एप्रिलपर्यंत भारतात दाखल होणार आहे.
 
हा फ्लॅगशिपचा अनुभव देणारा मिडरेंज फोन नोर्ड सीई ३ ची पुढील आवृत्ती असणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ७ प्लस जनरेशन ३ प्रोसेसर या चीपसेटवर आधारित असणार आहे. मल्टिमीडिया टास्किंगरिता हा प्रोसेसर जाणला जातो.याशिवाय फोनची रॅम एलपीडीडीआए (LPDDR4) असून यामध्ये अधिकची ८ जीबी रॅम वर्चुअल सेट करता येणार. तसेच ६.७४ फ्लुईड अमोलडेड डिस्प्ले, (१२४०×२७७२ पिक्सेल) असणार आहे.१२० हर्टजचा रिफ्रेश रेट यात असून ड्युअल रिअर कॅमेरा आहे.मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर, १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असणार आहे.
 
या फोनमध्ये दोन वेरिएंट लाँच करण्यात येणार आहेत.पहिला ८ जीबी रॅम+१२८ जीबी रॅम व ८ जीबी +२५६ जीबी रॅम असणार आहे. पहिल्या वेरिंएटची किंमत २४९९९ असून दुसऱ्या वेरिंएटची किंमत २६९९९ रुपये असणार आहे.कंपनीकडून याबाबत अधिकृत भाष्य करण्यात आले नाही. पण ही किंमत बाजारात लीक झाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
 
वन प्लस e Nord CE4 वर OnePlus च्या कस्टम ColorOS 14 सह नवीनतम अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर चालण्याची अपेक्षा आहे. हा युजर इंटरफेस स्टॉक च्या तुलनेत अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि ऑप्टिमायझेशनसह वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस देते.