काव्यातून राहुल देशपांडेंनी दिली 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल खास प्रतिक्रिया

    28-Mar-2024
Total Views |
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
 

rahul  
 
मुंबई : दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryveer Savarkar) चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांसोबतच मराठी कलाकारांना देखील या चित्रपटाने भारावून टाकले आहे. अनेक कलाकार या चित्रपटाचे आणि रणदीपचे (Swatantryveer Savarkar) कौतुक करत आहेत. आता संगीतकार, गायक राहुल देशपांडे यांनी अगदी मोजक्या शब्दात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे कौतुक केले आहे.
 
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिल्यानंतर राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, "शतजन्म शोधिताना शत आर्ती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या ! Take a bow रणदीप हुड्डा." राहुल देशपांडेनी यात सावरकरांनी लिहिलेल्या काव्याच्या ओळी वापरुन रणदीपच्या अभिनयाचे आणि चित्रपटाचे कौतुक केले आहे.
 

rahul post  
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१० कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी, चौथ्या दिवशी २.१५ कोटी आणि पाचव्या दिवशी १.०७ कोटी असे एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत १२.४१ कोटी केली आहे.