बिग बॉसच्या २५ लाख रुपयांतील अर्धे पैसेही मिळाले नाहीत; शिव ठाकरेचा मोठा खुलासा

    28-Mar-2024
Total Views |
शिव ठाकरे याने रॉडिज ते बिग बॉस असा प्रवास केला होता.
 

shiv  
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस सीझन २ च्या शोचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) याने या कार्यक्रमाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश मांजरेकर करतात. दरम्यान, आत्तापर्यंत शिव (Shiv Thakare) मराठी सह हिंदी रिएलिटी शोमध्ये देखील झळकला होता. एका मुलाखतीत शिव ठाकरे (Shiv Thakare) याने बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर बक्षिसाच्या ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे मिळाले असल्याचे म्हटले आहे.
 
शिव ठाकरेने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी शिव म्हणाला, "शोच्या बक्षिसाची किंमत रोख २५ लाख रुपये होती. पण मला त्याचे अर्धेही मिळाले नाहीत. अंतिम फेरीच्या काही तास आधी निर्मात्यांनी ट्विस्ट आणला आणि बक्षिसाची रक्कम आठ लाखांनी कमी म्हणजेच १७ लाख केली होती. बरं हे १७ लाखही पूर्ण नाहीच मिळाले. त्यातूनही मला केवळ ११.५ लाख रुपयेच मिळाले होते. यामध्ये कुटुंबियांचं विमानप्रवासाचं तिकीट आणि कॉस्च्युम होतं."
 
दरम्यान शिव ठाकरे याने बिग बॉस या कार्यक्रमाबद्दल इतके मोठे वक्तव्य केल्यानंतर याचे पडदास काय उमटणार याची सध्या चर्चा रंगू लागली आहे. तसेच, मराठी नंतर त्याला हिंदी बिग बॉसचीही ऑफर मिळाली होती. इथेही तो रनर अप ठरला होता. त्यानंतर 'झलक दिखला जा', 'खतरो के खिलाडी' अशा एकामागोमाग एक रिएलिटी शोमध्ये त्याने भाग घेतला होता.