कर्जदारांसाठी दिलासा : आरबीआयने अल्ट्ररनेटिव फंड साठी नियम शिथिल केले

आता नवीन तरतूदी केवळ नवीन गुंतवणूकीसाठी लागू

    28-Mar-2024
Total Views |

RBI
 
 
 
 
मुंबई: अल्ट्ररनेटिव फंड साठी (Alternative Fund) नियमात बदल करण्याची मागणी कर्जदारांकडून सातत्याने करण्यात येत होती. आरबीआयने यांचा आढावा घेत यातील कडक शिथिल करत गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे.
 
पाठपुरावा केल्यानंतर आरबीआयने पूर्ववत गुंतवणूकदारांना संपूर्ण गुंतवणूकीची तरतूद केल्यानंतरच गुंतवणूक करणे शक्य होते. आता फक्त एआयएफ (Alternative Investment Fund) मध्ये गुंतवणूक केलेल्या कंपन्यामधील जो हिस्सा पुन्हा कर्ज घेणाऱ्या कंपनीत गुंतवला जाईल त्याच हिस्सावर ही नियमांची तरतूद करावी लागणार आहे.
 
डिसेंबर २०२३ मध्ये आरबीआयने बँकांना एकआयएफमध्ये गुंतवणूक करण्यास सुचवले होते. याचे मुख्य कारण म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला अधिक रक्कम जमा करण्याची मिळत असून दुसरीकडे सोयीच्या हप्त्यात कर्जफेड करण्याची संधी ग्राहकाला मिळेल. ज्यामुळे 'Bad Loan' (बुडित) हा शिक्का न लागता देयकर्त्याला आपली गुंतवणूक परत मिळवता येईल.
 
तज्ञांच्या मते ही गुंतवणूक केवळ लिस्टेड (नोंदणीकृत) कंपन्यांना करता येणार आहे. ही गुंतवणूक खाजगी गुंतवणूकदार व व्हेंचर कॅपिटल यांना लागू होत नाही. त्यामुळे यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.