मोठी बातमी! काँग्रेस उमेदवाराचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द; उमेदवारी रद्द होण्याची शक्यता

28 Mar 2024 12:38:01
 
रामटेक लोकसभा मतदारसंघातुनही महायुतीकडुन शिवसेनेचे राजु पारवे तर महाविकास आघाडीकडुन काँग्रेसच्या रश्मी बर्वे Rashmi Barve यांनी अर्ज दाखल केला आहे. रश्मी बर्वे यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याची माहीती आहे. त्यामुळे आता त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाण्याची श्यक्यता आहे.
 
congress
 
नागपुर : लोकसभा निवडणुक २०२४ साठी महाराष्ट्रातील पहील्या टप्प्यातील जागांसाठी नुकतेच सर्व पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधिर मुनगंटीवार यांसारख्या मोठ्या नेत्यानीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
रामटेक लोकसभा मतदारसंघातुनही महायुतीकडुन शिवसेनेचे राजु पारवे तर महाविकास आघाडीकडुन काँग्रेसच्या रश्मी बर्वे Rashmi Barve यांनी अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही या मतदारसंघातुन आपले उमेदवार दिले आहेत. या मतदारसंघातील उमेदवारी छानणी प्रक्रीया सुरु असताना रश्मी बर्वे यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याची माहीती आहे. त्यामुळे आता त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाण्याची श्यक्यता आहे.

हे वाचलत का ?- विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार
 
रश्मी बर्वे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा मुद्दा त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या पुर्वीपासुनच गाजला होता. तरीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केला होता. रामटेक मतदारसंघ अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी राखिव आहे. जात पडताळणी समितीकडुन रश्मी बर्वे यांचं जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आता यावर अंतिम निर्णय निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात येईल. त्यांच्या निर्णयातही उमेदवारी रद्द होण्याची शक्यता जास्त आहे.
 
काँग्रेसच्याच नेत्यांनी यापुर्वी त्यांचे प्रमाणपत्र रद्द होईल असे सांगितले होते. रामटेक मधुन निवडणुक लढवण्यासाठी काँग्रेसकडुन इच्छुक असलेले किशोर गजभिये यांनी रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो असे सांगितले होते. किशोर गजभिये यांनी सनदी अधिकारी म्हणुन काम पाहीले आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे अनुभावातुन मी सांगत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या छाननीत रश्मी बर्वे यांचा अर्ज टिकणार नाही, असे गजभिये म्हणाले होते.

हे वाचलत का ?- संदेशखालीत अत्याचार होत असताना टीएमसी खासदार रीलमध्ये व्यस्त!
 
रश्मी बर्वे यांच्या फॉर्मवर पर्यांयी उमेदवार म्हणुन त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले आहे. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्द केल्यास श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे पर्यांयी उमेदवार असतिल.


Powered By Sangraha 9.0