कोटक बँकेने सोनाटा फायनान्सचे अधिग्रहण केले

५३७ कोटी रुपयाला सोनाटा फायनान्सचे अधिग्रहण

    28-Mar-2024
Total Views |

Kotak
 
मुंबई: नुकतेच कोटक महिंद्रा बँकेने एनबीएफसी (विना बँकिंग वित्तीय संस्था) सोनाटा फायनान्स (Sonata Finance) चे अधिग्रहण केले आहे. आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत सोनाटा फायनान्स लिमिटेडच्या असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) २६२० कोटी इतक्या असून कंपनीच्या एकूण ५४९ शाखा १० राज्यात पसरलेल्या आहेत ‌
 
कोटक महिंद्रा बँकेच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार,' बँकेने संपूर्ण १०० टक्के सोनाटा कंपनीचे अधिग्रहण (Acquisition ) केले आहे. सोनाटा फायनान्स लिमिटेड या एनबीएफसीचे ५३७ कोटी रुपयांच्या व्यवहारात अधिग्रहण केल्याचे बँकेने म्हटले आहे.
 
या अधिग्रहणामुळे कोटक बँकेच्या अंतर्गत सोनाटा फायनान्स लिमिटेड ही उपकंपनी असणार आहे. २०ऑक्टोबर २०२३ ला रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्राकडून सोनाटा फायनान्सवरील अधिग्रहणाला मान्यता दिली होती. ही बातमी येताच कोटक महिंद्रा बँकेच्या समभागात सकाळच्या सत्रात सुमारे १ टक्क्याने वाढ झाली होती.