IPO Update: आजपासून K2 Infragen आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खूला

28 Mar 2024 18:24:47

IPO
 
मुंबई: आजपासून शेअर बाजारात K2 Infragen IPO गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. या तीन दिवसीय आयपीओ २८ ते ३ एप्रिलपर्यंत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीकडून १११ ते ११९ हा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओतून (Initial Public Offer) कंपनी ४०.५४ कोटींचा निधी जमा करणार आहे.
 
२०१५ मध्ये स्थापन झाल्यापासून के २ इन्फ्राजेन कंपनी इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग कंपनी कंपनी मार्फत पॉवर इंजीनियरिंग, प्रोकरमेंट, कन्स्ट्रक्शन अशा प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येतात.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीची ग्रे मार्केटमध्ये प्रति समभाग २५ रुपये असण्याची शक्यता आहे. एप्रिल ८ पर्यंत शेअर बाजारात कंपनी नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे. या आयपीओत कमीत कमी १२०० समभाग (शेअर) गुंतवणूकदारांना विकत घ्यावे लागतील.
 
कंपनीतर्फे बुक लिडिंग मॅनेजर म्हणून Expert Global Consultants Private Limited या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या आयपीओचे रजिस्ट्रार म्हणून Kfin Technologies म्हणून काम करणार आहे.
 
कंपनीकडून ३४.०६ लाखांचे आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुले राहणार आहेत. रिटेल गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी १४२८०० रुपयांची गुंतवणूक करण्याची अट घातली गेली आहे. अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांसाठी २७.७९ टक्क्यांचे समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) १८.५३ टक्क्यांचे समभाग कंपनीने राखीव ठेवले आहेत.
 
कंपनीला आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत PAT (करोत्तर नफा) ४६३.७९ टक्क्याने वाढला असून कंपनीच्या महसुलात १०३.२५ टक्क्याने वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन (बाजारी भांडवल) १५०.१६ कोटी आहे. ही कंपनी आयपीओ एसएमइ (SME) अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे.
 
कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, आयपीओतील प्राप्त झालेल्या निधीचा विनिमय वर्किंग कँपिटल गरजेसाठी, भांडवली खर्चासाठी व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.या कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) दिलीप दावडा आहेत.
 
Powered By Sangraha 9.0