'हिरो नंबर वन' चा शिवसेनेत जाहीर प्रवेश

28 Mar 2024 17:29:53
govinda shivsena
 
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा Govinda Shivsena यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपुर्वीच गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासुनच गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. गोविंदा यांच्या पक्षप्रवेशाने त्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.
 
यावेळी शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, विधानपरीषदेच्या सभापती निलम गोऱ्हे, मंत्री दादजी भुसे, आमदार संजय शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. मला मिळालेली जबाबदारी मी योग्य रितीने पार पाडेन असं यावेळी गोविंदा यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासुन मुंबईची विकास झाला आहे. मुंबई सुशोभित झाली आहे असं मत गोविंदा यांनी व्यक्त केलें. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानतो असंही ते यावेळी म्हणाले.

हे वाचलत का ?- #सांगली_काँग्रेसचीच : मविआत ठाकरेंविरोधात बंडखोरी
 
गोविंदा यांनी यावेळी मराठीतुन भाषण केले. गोविंदा विकासाच्या मुद्दयावर प्रभावित होऊन शिवसेनेत आले आहेत. मुंबईत मोठी चित्रपटसृष्टी आहे. त्यात खुप लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे असं गोविंदा यांनी सांगितलं होतं. त्यावर काम करण्याची हमी मी त्यांनी दिली आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
गोविंदा कोणत्याही अटी शर्ती न घालता आपल्या पक्षात आले आहेत. आधी वनवास होता आणि आता रामराज्यात येत आहे असं गोविंदा यांनी म्हटल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. गोविंदा यांनी यापुर्वी मुंबई मधुन लोकसभा निवडणुक लढवली होती. ज्यामध्ये त्यांनी विजय सुद्धा मिळवला होता. त्यामुळे अभिनय आणि राजकारण यांची जाण असलेला नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Powered By Sangraha 9.0